WTC Final 2023 : यंदाच्या वर्षात बऱ्याच महत्त्वाच्या स्पर्धा क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवताना दिसणार आहेत. किंबहुना त्याची सुरुवातही झाली आहे. जिथं एकामागोमाग एक नवनवीन स्पर्धा आणि सामने क्रीडाप्रेमींच्या नजरा वळवत आहेत. नुकताच पार पडलेला (IPL 2023) आयपीएलचा 16 वा हंगाम हे त्यातलंच एक उदाहरण. त्यामागोमागच आता क्रिकेट जगतातील अत्यंत महत्त्वाचा असा India vs Australia या दोन्ही संघांमधील वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिप (WTC Final) चा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमधील (England) केनिंगटन ओवल स्टेडियममध्ये हा सामना पार पडणार आहे. सध्या या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी लहरी हवामानाची भीती मात्र प्रत्येकाच्यात मनात घर करून आहे. कारण, इंग्लंडमध्ये जिथं सामना आहे त्या भागावर सध्या पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती ओवलवर होते का, हाच प्रश्न क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत. 


पावसानं सामन्यात व्यत्यय आणल्यास पुढे काय? 


WTC Final दरम्यान पावसानं धुमाकूळ घातल्यास किंवा सामना अनिर्णित राहिल्यास नेमका कोणता संघ विजेता ठरणार याचा तेढ आता सुटला आहे. 7 ते 11 जून या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या WTC Final मध्ये पाऊस आला आणि त्यानं सामन्याचं चित्रच पालटलं तर हा सामना 12 जून या Reserve Day ला खेळवला जाईल. 


आणखी शक्यताही वाचून घ्याच 


रिजर्व डे ला सामना होऊनही तिथंही तो निकाली निघाला नाही तर, ICC कडून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना विभागून बक्षीस देण्यात येईल. पावसामुळं सामन्याबाबत कोणताही निकाल लावणं अशक्य झाल्यास हा मार्ग अवलंबला जाऊ शकतो. त्यामुळं आता पाऊसच WTC Final चा विजेता ठरवणार असं म्हणायला हरकत नाही.


हेसुद्धा वाचा : World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल; विजेत्या टीमला मिळणार इतके पैसे!


 दरम्यान, पावसाच्या मनात नेमकं चाललंय काय हे सामन्याच्याच दिवशी कळणार आहे. तूर्तास आपण नजर टाकूया दोन्ही संघांतील सहभागीत खेळाडूंवर.... 


ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश इंगलिस (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, जोश हेजलवुड, नाथन लियोन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क.


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.