India vs Australia Playing XI: सर्वांना प्रतिक्षा असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळत जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल (WTC Final 2023) सामना खेळण्यास सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताने टॉस (Ind vs Aus Toss Update) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने धक्कादायक निर्णय घेत सर्वांना अचंबित केलं. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर रोहितने प्लेइंग इलेव्हन कशी असेल, यावर स्पष्टीकरण दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय. तर आश्विनला (R Ashwin) संघाबाहेर ठेऊन उमेश यादवला (Umesh Yadav) टीममध्ये सामील करून घेतलंय. तब्बल 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी (ICC Tournament) टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळू शकते.



टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 6 बॅट्समन, 2 ऑलराऊंडर आणि 3 फास्ट बॉलर प्लेइंग 11 मध्ये उतरवले आहेत. विकेटकिपर म्हणून केएस भरतला सातव्या क्रमांकावर संधी देण्यात आलीये. जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांचा संघाने ऑलराऊंडर खेळाडू म्हणून समावेश केलंय.  उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन फास्टर गोलंदाजांना संघात घेतलं आहे.


आणखी वाचा - टीममध्ये नसतानाही दिनेश कार्तिक बनवणार टीम इंडियाला 'चॅम्पियन'; पाहा काय करतोय?


पाहा दोन्ही संघाची Playing XI


ऑस्ट्रेलिया (Playing XI): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.


भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज