WTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा `विराट` विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही.
WTC Final 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही.
प्रचंड जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मोठा झालेला हा खेळाडू सध्याच्या घडीला सर्वाधिक शतकांच्या बाबतीत फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) एकूण शकरांतच्या आकड्यापासून माहे आहे. किंबहुना तो अशाच फॉर्ममध्ये राहिला तर, तो दिवससुद्धा दूर नाही असं क्रिकेट जाणकारांचं मत.
हेसुद्धा वाचा : WTC Final 2023: Office की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप? उद्यापासून क्रिकेट चाहत्यांची होणार मोठी गोची
विराट सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडतो की नाही, ही भविष्यातील गोष्ट. पण, सध्या मात्र एक कमाल विक्रम मोडण्याच्या तयारीत तो असल्याचं म्हटलं जात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 7 जुनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या निमित्तानं तो ऑस्ट्रेलियाविरोधातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 5 हजार धावा करण्यापासून अवघा 55 धावा मागे आहे.
कांगारुंविरोधात कोहलीची कामगिरी
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळत असताना विराटनं तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 16 शतकं आणि 24 अर्धशतकांची खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात तो विरोधी संघासाछी घातट टकू शकतो. त्याचा हा एकंदर फॉर्म पाहता तो क्रिकेट जगतात मानानं नाव घेतल्या जाणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांचाही विक्रम मोडू शकतो असं म्हटलं जात आहे.
हजारो धावांचा डोंगर...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनीच एका संघाविरोधात 5 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत यामध्ये सचिन तेंडुलकरच्याही नावाचा समावेश आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरोधात 20 शतकांच्या बळावर 6707 धावा, तर श्रीलंकेविरोधात 17 शतकांच्या बळावर 5108 धावा केल्या होत्या.
सर डॉन ब्रॅडमन यांचा तो विक्रम विराट मोडणार का?
ऑस्ट्रेलियातील माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव असणारे सर डॉन ब्रॅडमन यांचंही नाव या यादीत आहे. त्यांनी इंग्लंडविरोधात खेळताना 19 शतकांच्या बळावर 5028 धावा रचल्या. आता विराट या विक्रमापासून अवघा काही धावा मागे असून, त्यानं या धावा पूर्ण केल्यास तो हा विक्रमही मोडून पुढे जाणार आहे. त्यामुळं आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा विराटच्याच कामगिरीकडे लागल्या आहेत.