IND vs AUS WTC Final : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत झालं. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं. 


राष्ट्रगीता दरम्यान भावूक झाला हिटमॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट प्रेमींची प्रतिक्षा अखेर संपली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याला सुरुवात झाली. दरम्यान सामना रंगण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये राष्ट्रगीतानंतर भारतीय खेळाडूंचे डोळे पाणावल्याचं दिसतंय. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) भावूक झालेत. राष्ट्रागीत झाल्यानंतर या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलंय. 



वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट टीमच्या ( Team India ) प्लेइंग इलेव्हनमधून स्पिनर गोलंदाज अश्विनला बाहेर ठेवण्यात आलं. याचसोबत विकेटकीप इशान किशनच्या जागी केएस भरतचा समावेश करण्यात आला आहे. या दोन बदलांमुळे चाहते मात्र नाराज झाल्याचं दिसून येतंय.


टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यासाठी 6 बॅट्समन, 2 ऑलराऊंडर आणि 3 फास्ट गोलंदाज यांना प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आलीये. विकेटकिपर म्हणून केएस भरतला सातव्या क्रमांकावर संधी देण्यात आलीये. जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांचा संघाने ऑलराऊंडर खेळाडू म्हणून समावेश केला आहे.


कशी आहे दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जेडजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलिया: डेविड वार्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कैमरून ग्रीन, एलेक्स कैरी (विकेटीकपर), मिचेल स्टार्क, पैट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलँड, नाथन लियोन