WTC Final | उडता गिल! Shubaman चा जबरदस्त कॅच, Ross Taylor माघारी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्याचा (ICC World Test Championship Final) आजचा पाचवा दिवस (WTC Day 5) आहे.
साऊथम्पटन : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्याचा (ICC World Test Championship Final) आजचा पाचवा दिवस (WTC Day 5) आहे. या पाचव्या दिवसाचा खेळही पावसाच्या व्यत्ययामुळे काही मिनिटांनी उशिरा सुरु झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 101 अशी होती. त्यानंतर पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यानंतर अखेर पाचवा दिवसाचा खेळ सुरु झाला. टीम इंडिया (Team India) तिसऱ्या विकेट्सच्या शोधात असताना मोहम्मद शमी (Mohammed Shami) ब्रेक थ्रू मिळवून दिला. युवा शुबमन गिलने (Shubaman Gill) हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. (wtc final day 5 Shubman Gill will taken Ross Taylor diving Catch)
नक्की काय घडलं?
केन आणि रॉस टेलर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अधिक धावा जोडल्या नाहीत. पण दोघेही मैदानात तंबू ठोकून उभे होते. टीम इंडिया विकेट्सच्या शोधात होती. शमीने टीम इंडियाला तिसरी विकेट काढून दिली. सामन्यातील 64 वी ओव्हर मोहममद शमी टाकायला आला. टेलरने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर शॉर्ट कव्हरच्या दिशेने मारला. तिथे शुबमन गिल उभा होता. गिलपासून चेंडू काही अंतरावर होता.
गिलने वेळीस चेंडूचा अंदाज घेत हवेत झेपावला अन टेलरचा अफलातून कॅच टिपला. टेलर हा न्यूझीलंडचा महत्वाचा आणि अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे टेलरची विकेट महत्वाची होती. गेलने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच या कॅचसाठी गिलचं कौतुक केलं जात आहे. गिल सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
संबंधित बातम्या :
WTC : अरे बापरे! बुमराहकडून झाली गडबड, मैदान सोडून जावं लागलं बाहेर