WTC Point Table : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यातही पराभूत झाल्यामुळे WTC पॉईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table) भारताची पहिल्या क्रमांकावरून घसरण झाली आहे. तिसऱ्या टेस्टपूर्वी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया (Team India) आता थेट दुसऱ्या क्रमांकावर आली असून यासह त्यांचं टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे सुद्धा जवळपास अशक्यचं झालं आहे. तेव्हा WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात. 


WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरुद्ध भारताने तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळली. या सीरिजपूर्वी टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये नंबर एक वर होती. तसेच भारताची विजयाची टक्केवारी इतरांच्या तुलनेत जास्त होती. मात्र न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर कधीही पराभूत न झालेल्या टीम इंडियाला बंगळुरूमध्ये पहिला धक्का मिळाला. त्यानंतर पुण्यात झालेल्या टेस्ट सामन्यातही न्यूझीलंडकडून पराभूत होऊन भारताने तब्बल 12 वर्षांनी घरच्या मैदानावर टेस्ट सीरिज गमावली. तर रविवारी मुंबई सामन्यातही टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी ही 58.33 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे भारताची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून पहिलं स्थान हे आता ऑस्ट्रेलियाने काबीज केलं आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकून 62.50 या विजयाच्या टक्केवारी सह ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये सध्या नंबर 1 वर पोहोचली आहे. 


हेही वाचा : मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार


 


WTC फायनलमध्ये पोहोचणं अशक्यचं?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2025 मध्ये होणार असून त्याकरता क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला 6 पैकी 4 सामने जिंकणं महत्वाचं होतं. यात न्यूझीलंड विरुद्ध एक आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टेस्ट सामना गमावल्यावर भारताला आता WTC फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवण भारतासाठी तेवढं सोपं नसेल. आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड इत्यादीं विरुद्ध झालेलया टेस्ट सीरिज या भारतात खेळल्या गेल्या. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे.