WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय `हे` काम, म्हणाला...
टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...
Jinder Mahal On Virat Kohli: सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने दमदार शतक ठोकत 1205 दिवसांचा दुष्काळ संपवला आहे. वनडे, टी-ट्वेंटी आणि त्यानंतर आता कसोटी सामन्यात शतक झळकावल्याने किंग इस बॅक अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशातच आता WWE Superstar ने मोठं वक्तव्य केल्याने किंग कोहली पुन्हा चर्चेच्या अड्यावर अडून राहिला आहे. (WWE indian Superstar jinder mahal wants to gym with cricketer virat kohli latest marathi news)
डब्ल्युडब्ल्युईमध्ये नाव कमावणारा स्टार भारतीय चॅम्पियन (WWE Champion) जिंदर महल (Jinder Mahal) याने नुकतेच विराट कोहलीबद्दल असं काही बोललाय की, त्यामुळे विराट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याने विराट कोहलीसोबत जिम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जिंदर महल एका कार्यक्रमात आला होता. Who would you rather असं या शोचं नाव होतं. त्यावेळी जिंदर महलने सर्व प्रश्नांची भेधडक उत्तरं दिली. त्यावेळी त्याने विराट कोहली, बबिता फोगट, जॉन एब्राहम आणि ड्रू मॅकइंटायर यांच्यासह जीम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे.
तुम्हाला जीम करायला आवडतं. तुम्ही ती एन्जॉय देखील करता. जर तुम्हाला मोठ्या व्यक्तींसोबत जीम करण्याची संधी मिळाली तर कोणासोबत कराल?, असा सवाल विचारण्यात आला होता.
नेमकं काय म्हणाला Jinder Mahal ?
मला विराट कोहलीसोबत जीममध्ये जायला आवडेल. तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो ज्या पद्धतीने वेग आणि शक्ती निर्माण करतो, मलाही त्याच्याकडून तंत्र शिकायला आवडेल, असं जिंदर महल म्हणालाय. (Jinder mahal wants to gym with virat kohli)
Virat Kohli ने ठोकलं शतक
टी-ट्वेंटी क्रिकेट त्यानंतर वनडे क्रिकेट आणि आता टेस्चमध्ये शतक ठोकत विराट कोहलीने शतकांचा दुष्काळ संपवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विराट शतक झळकावण्यासाठी संघर्ष करत होता. मात्र, आता तो पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं पहायला मिळतंय. पहिल्या डावात विराटने चौथ्या क्रमांकावर उतरून आत्तापर्यंत 155 धावा केल्या आहे. अजूनही तो मैदानात पाय रोवून उभं असल्याचं पहायला मिळतंय.