नवी दिल्ली : WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटमध्ये लढणारी भारतीय रेसलर कविताचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झाला आहे. WWEने आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर कविताच्या फाईटचा व्हिडिओ अपलोड केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील फ्लोरिडात १४ जुलैपासून सुरु झालेल्या डब्लूडब्लूई माय यंग क्लासिक चॅम्पियनशिपचे व्हिडिओज रेकॉर्ड करण्यात आले होते.


भारतीय रेसलर कविता आपल्या खास अंदाजात रिंगमध्ये उतरली होती. या व्हिडिओमध्ये कविता न्यूझिलंडची रेसलर डकोटा काई हिच्यासोबत लढताना दिसत आहे. या चॅम्पियनशीपमध्ये उतरणारी कविता पहिली भारतीय महिला ठरली आहे.



या चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील अनेक देशांतील महिला रेसलरने सहभाग घेतला होता. ज्यामध्ये भारत, अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी, जापान, चीन सारख्या देशातील महिला रेसलर्सचा समावेश आहे.


रिंगमध्ये कविता आणि डकोटा यांच्यात जोरदार मुकाबला झाला. मात्र, डकोटाचा स्पीड आणि ताकदसमोर कविता जास्त वेळ टिकून राहू शकली नाही.