नवी दिल्ली : गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना. हाच जॉन सीना आता निवृत्ती घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.


जॉनच्या निवृत्तीची साधी चर्चाही नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात, जॉन सीनाच्या निवृत्तीची चर्चा म्हणजे केवळ अफवा असे अभ्यासकांचे म्हणने आहे. कारण, जॉनच्या निवृत्तीची साधी चर्चाही नाही. ना त्याने कधी याची जाहीर वाच्यता केली. ना त्याच्या वर्तुळातील कोणी तशी माहिती दिली. पण, स्वत: जॉनने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा संदर्भ घेतला तर, निवृत्तीच्या चर्चेला काही पुष्टी मिळते. सध्या जॉन सिना wweमध्ये पूर्णपणे सक्रीय आहे.


'जेवढा वेळ बाकी आहे तेवढा वेळ चांगल्या पद्धतीने वापरायचा'


दरम्यान, जॉनने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीनुसार, तो म्हणाला होता की, मला माहिती आहे की, माझे थोडेच दिवस राहिले आहेत. पुढच्या एप्रिलमध्ये मी 40 वर्षांचा होईन. माझ्याकडे टॅलेंट आहे. जे चांगली कामगिरी करत आहे. पण, मला माहिती नाही की, किती वर्षे माझ्याकडे बाकी आहेत. त्यामुळे माझ्याकडे जेवढा वेळ बाकी आहे तेवढा वेळ चांगल्या पद्धतीने वापरायचा असा माझा विचार आहे.


जॉन सीनाची कामगिरी


जॉनने एकूण 1033 सामने जिंकले आहेत. तर, केवळ 254 सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. 


1033 मैच जीते, 254 हारे : सफलता प्रतिशत 76.86
प्रमोशन                 जीत    ड्रा    हार
एपीडब्ल्यू                2       0    0
एचडब्ल्यूए              0       0     1 
ओव्हीडब्ल्यू            21       0    17
डब्ल्यूडब्ल्यूई      1007    57   235
डब्ल्यूडब्ल्यूएफ        3      0     1
एकूण                 1033    57   254