WWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल
कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात WWE मध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरलेली द ग्रेट खलीची शिष्या कविता देवीचा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होत आहे. WWE ने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर कविताच्या फाईटचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.
१४ जुलै पासून सुरू झालेलल्या यंग क्लासिक टूर्नामेंटचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ WWE तर्फे हळूहळू युट्यूबवर टाकण्यात येत आहेत. यातील पहिल्या सामन्यात कविता देवी हरली होती पण या रिंगमध्ये उतरणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तिचा मुकाबला ३२ वुमेनच्या एलिमिनेशन राऊंड डकोटा काई सोबत झाला होता.
WWE हॉल ऑफ फेमर 'मे यंग' च्या आठवणीत 'मे यंग क्लासिक' टूर्नामेंटंचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अनेक देशांमधून टॉपच्या महिला रेसलरने यात सहभाग घेतला होता. अमेरिका, न्यूझीलॅंड, जर्मनी, जपान, मेक्सिको, चीन आणि भारत अशा सर्व मोठ्या देशातील महिला रेसलरने या टूर्नामेंटमध्ये भाग घेतला होता.
या रिंगमध्ये कविता आणि डकोटा यांच्यात घमासान स्पर्धा पाहायला मिळाली. पण या हार्ड हिटिंग स्पर्धेत डकोटाच्या स्पीड आणि ताकदीपुढे कविता जास्तवेळ टिकू शकली नाही. बेस रनिंग किक आणि टॉप रोपने सोल स्टॉम्प ऑफ देऊन विजय निश्चित केला.