नवी दिल्ली : यंदाच्या (२०१८) रॉयल रंबल सामन्यात WWEमधला इतिहास घडला. कारण, या वेळी रॉयल रंबलचा विजेता असा ठरला की, ज्याचा कोणी विचारच नव्हता केला. खरे तर, या सामन्यात दिग्गज रेसलर रोमन रेंस हा विजेता ठरेल असा जवळपास सर्वांचाच अंदाज होता. पण, तो फोल ठरवत अगदी अनपेक्षीतपणे नाकामुराने बाजी मारली.


अंदाज ठरला फोल, मिळाला धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याची सुरूवात रूसेवच्या दमदार पदार्पणाने झाली. त्यानंतर आला तो बॅलर. त्यानंतर एकापाठोपाठ एक सुपरस्टार्स रिंगमध्ये आले. त्यामुळे सर्वांनाच आशा होती की या वेळी रोमन रेंस किंवा तसाच एखादा दिग्गज रेसलर रॉयल रंबलचा विजेता होईल. पण, घडले भलतेच. सर्व बडे बडे सुपरस्टार आल्यावर अगदी शेवटच्या काही क्षणात १४ व्या क्रमांकाला नाकामुराने एण्ट्री केली. त्याने शेवटच्या क्षणी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना रोमन रेंसला एलिमिनेट केले आणि रॉयल रंबलवर आपले नाव कोरले. 


शेवटच्या क्षणी कडवी टक्कर


सामन्याच्या शेवटच्या काही क्षणात ४ रेसलर्समध्ये घमासान टक्कर झाली. ज्यात फिन बॅलर, रोमन रेंस, शिंस्के नाकामुरा आणि जॉन सिना हे होते. चारही रेसलर्सनी एकमेकांना एलिमिनेट करण्याचा भरपूर प्रयत्न केला. या प्रयत्नात जॉन सिनाने पहिल्यांदा फिन बॅलरला एलिमिनेट केले. त्यानंतर नाकामुराने सिनाला एलिमिनेट केले. शेवटी रंगमध्ये उरले नाकामुरा आणि रोमन रेंस दोघांनीही शानदार खेळी केली. मात्र, अखेरच्या क्षणी नाकामुरा रोमन रेंसवर भारी पडला. त्याने रॉयल रंबलचा किताब जिंकला.