नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात चाहते आहेत. टीम इंडियाची विजयी घौडदोड सुरु असल्यानेच विराट सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. विराटच्या या यशामागे त्याचं फिटनेसही फार महत्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या चांगल्या प्रदर्शनामागे फिटनेस असल्याचं विराट मानतो. फिटनेस चांगला असेल तर दुखापतग्रस्त होण्याची शक्यता कमी होते असं विराट मानतो. त्यामुळेच डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रेसलर फिन बलोरही विराटचा मोठा चाहता बनला आहे. 
इतकचं नाही तर, फिटनेसची ट्रेनिंग घेण्यास डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रेसलर फिन बलोर इच्छुक असल्याचं म्हटलं आहे.


विराट कोहलीकडून सिक्रेटमंत्रा शिकण्याची गरज आहे कारण फिन बलोर आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतो. फिनने सांगितले की, मला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला भेटायचं आहे तसेच त्याच्यासोबत प्रॅक्टीस मॅचही खेळायची आहे. विराट कोहलीसोबत मैदानात एक-दोन राऊंडही मारायचे आहेत. जेणेकरुन मी विराटचा फिटनेस जवळून पाहू शकेल.


आयरलँडमधील ३६ वर्षीय रेसलर बलोर याने सांगितले की, मला क्रिकेटबाबत जास्त माहिती नाहीये. पण हा खेळ मी पाहिला आहे. मी आयर्लंडमधील असल्याने मला माहिती आहे की, आमच्या देशातील टीमही क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. गेली १५ वर्ष मी जापान आणि अमेरिकेत असल्याने क्रिकेटबाबत मला अधिक माहिती नाहीये. पण, आयरलँड आणि भारत यांच्यात होणारी क्रिकेट मॅच पाहण्याची माझी इच्छा आहे.