जींद : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १३-१४ जुलैला होणाऱ्या WWEमध्ये भारताकडून एकमेव महिला पैलवान कविता दलाल सहभागी होणार आहे. ३० वर्षांची कविताही WWEमध्ये हिस्सा घेणारी पहिली भारतीय महिला आहे. WWEमध्ये कविता नक्कीच जिंकून येईल असा विश्वास तिची आई ज्ञानमतीनं व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कविता लहानपणापासून तगडी आहे. पाच वर्षांची असल्यापासून ती रोज एक वेळा अर्धा लिटर दूध पित आहे. याचबरोबर ती हलवा चूरमा आणि पुडेही खाते, असं तिच्या आईनं सांगितलं आहे. पाच भाऊ-बहिणींमध्ये कविताही सगळ्यात लहान आहे.