Yashasvi Jaiswal Century: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) डॉमिनिका कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल यांनी आपली दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. अशातच या सामन्यात पदार्पण करत असलेल्या यशस्वीने आपल्या पहिल्याच डावात शतक झळकलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयस्वालने 16 बॉलमध्ये आपलं खातं देखील उघडलं नाही, त्यानंतर तो थांबला नाही. एकामागून एक शानदार फटके खेळत त्याने विंडीजच्या गोलंदाजांची शाळा घेतली. जयस्वालने 215 चेंडूत 11 चौकार मारत शतक झळकावलं. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.


यशस्वी जयस्वाल भारताबाहेर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज (first Indian batsman who score a century on Test debut outside India) ठरला. त्याचबरोबर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी शिखर धवनने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर पृथ्वी शॉने राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी शतक झळकावलं होतं.


आणखी वाचा - Sunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!


यशस्वीच्या दमदार शतकानंतर पॅव्हेलियनमधील सहकाऱ्यांनी त्याचं उभं राहून राहून अभिनंदन केलं. प्रशिक्षक राहुल द्रविड याने यशस्वी जयस्वालचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. त्याला टीमच्या इतर खेळाडूंचीही साथ मिळाली. बीसीसीआयनेही ट्वीट करून यशस्वी जयस्वाल याचं कौतुक केलं आहे.



पाहा दोन्ही संघ


वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.


भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.