Yograj Singh About Yuvraj Singh : सचिन तेंडुलकर, एम एस धोनी यांच्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. युवराज सिंह भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटर म्हणून ओळखतात. आयसीसी वर्ल्ड कप 2007 च्या एका सामन्यात युवराज सिंहने इंग्लंडच्या बॉलरला सलग 6 बॉलवर 6 सिक्स मारून रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. तसेच 2011 वर्ल्ड कपमध्ये त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. युवराज सिंहचे वडील योगराज सिंह हे सुद्धा माजी क्रिकेटर होते. योगराज सिंह त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. असंच एक वक्तव्य त्यांनी स्वतःचा मुलगा युवराज सिंहबाबत केलं होत ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. 


युवराज सिंहला गोळ्या घालेन : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2013 मध्ये मॅच फिक्सिंगबाबत मोठा वाद झाला होता. यात एस श्रीसंत सह राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा योगराज सिंहने एका मुलाखतीत म्हंटले होते की जर त्यांचा मुलगा मॅच फिक्सिंगमध्ये सामील असता तर त्यांनी युवराजला गोळ्या घातल्या असत्या. मुलाखतीत योगराज सिंह यांना विचारण्यात आले होते की आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत ते मुलगा क्रिकेटर युवराज सिंहशी काही बोलले आहेत का? तर त्यांनी उत्तर देताना म्हंटले की, 'जर त्यांचा मुलगा स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील झाला तर मी त्याच्या डोक्यात गोळ्या घालेन'. ते म्हणाले, 'जर युवराज यात सामील झाला तर मी त्याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याची बॉडी अमर जवान ज्योति वर लटकवेन. हेच या देशाला माझे  देशाला माझे रक्ताचे वचन आहे'.


हेही वाचा : धोनीची लेक कोणत्या शाळेत शिकते? शाळेच्या एका वर्षाची फी ऐकून बसेल धक्का


 


2019 मध्ये युवराज सिंहने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती : 


भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युवराजने 2000 साली टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. 2017 साली त्याला भारताकडून शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली. युवराज सिंहने 304 वनडे सामन्यांत 8701 धावा, टेस्ट क्रिकेटमध्ये 1900 धावा तर टी 20 क्रिकेटमध्ये 1177 धावा केल्या आहेत.