धोनीची लेक कोणत्या शाळेत शिकते? शाळेच्या एका वर्षाची फी ऐकून बसेल धक्का

भारताचा माजी क्रिकेटर एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची फॅन फॉलोईंग अद्याप कमी झालेली नाही. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा जाणून घेण्यास त्याचे फॅन्स उत्सुक असतात.

Aug 23, 2024, 15:54 PM IST
1/5

भारताचा माजी क्रिकेटर एम एस धोनी याची पत्नी साक्षी हिने 11 फेब्रुवारी 2015 रोजी मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'झिवा' (Ziva ) असे ठेवण्यात आले. झिवाच्या नावाचा अर्थ 'तेजस्वी देवाचा प्रकाश' असा असतो. 

2/5

धोनी त्याच्या कुटुंबासह रांची येथे राहतो. येथे धोनीचा फार्महाउस सुद्धा असून तो निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे. धोनी त्याच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या अनेक एकर जागेत शेती सुद्धा करतो. 

3/5

धोनीची मुलगी झिवा ही रांची येथील सर्वात नामांकित शाळा टॉरियन वर्ल्ड स्कूलमध्ये शिकते. टॉरियन वर्ल्ड स्कूलची फी इतर शाळांच्या तुलनेत जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या शाळेची फी नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंत वार्षिक शुल्क 2,50,000 रुपये इतकी आहे. तर वार्षिक बोर्डिंग फी 4,70,000 रुपये आहे.

4/5

झिवा धोनी शिकत असलेल्या इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतची वार्षिक फी 2,75,000 रुपये आहे आणि इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची फी 3,05,000 रुपये आहे. ही शाळा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडे एज्युकेशन (CBSE) शी संलग्न आहे.

5/5

धोनीची मुलगी झिवा ही सध्या तिसरीत शिकत असल्याची माहिती आहे. टॉरियन वर्ल्ड स्कूल ही शाळा 2008 मध्ये अमित बजला यांनी स्थापन केलेली असून 65 एकर जागेवर पसरलेली आहे. एज्युकेशन टुडे मासिकानुसार, रांची आणि झारखंडमधील ती प्रथम क्रमांकाची शाळा आहे. अभ्यासासोबतच, शाळा सर्वांगीण शिक्षण आणि विविध आकर्षक उपक्रम राबवते.