Rohit Sharma: खूप डोकं लावताय तुम्ही...; टी-20 कर्णधारपदावरून प्रश्न विचारताच संतापला हिटमॅन?
Ind vs Afg T20I: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 सिरीज खेळणार आहे.
Ind vs Afg T20I: नुकतंच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टेस्ट सिरीज 1-1 अशी ड्रॉ केली आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात झालेल्या दारूण पराभवाचा बदला टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात घेतला. दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. अवघ्या अडीच दिवसांत हा टेस्ट सामना संपला आणि टीम इंडियाने केपआऊनमध्ये इतिहास रचला. दरम्यान यानंतर आता भारतीय खेळाडू टी-20 वर्ल्डकपच्या तयारीला लागेलत.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 सिरीज खेळणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या दुखापतींमुळे टीमचं कर्णधारपद कोणाकडे देणार हा मोठा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेतील सिरीज संपल्यानंतर रोहित शर्माला टी-20 च्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहितने अतिशय हुशारीने उत्तर दिले.
रोहितने दिलं खास उत्तर
दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माला प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये अफगाणिस्तान सिरीजबाबत प्रश्न विचारण्यात आला. रोहितला विचारण्यात आलं की, तो आणि विराट कोहली आगामी टी-20 सिरीजमध्ये खेळताना दिसणार का? यावर रोहितने अतिशय हुशारीने उत्तर दिलं. तो म्हणाला, "खूप डोकं लावताय तुम्ही... आता सध्या केपटाऊनवर लक्ष केंद्रित करा."
रोहित आणि विराट खेळणार का?
मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. या दोघांची अफगाणिस्तान टी20 सिरीजमध्ये त्यांची टीममध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्टइंडिजनमध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
भारत-अफगाणिस्तान टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहला टी20 सामना : 11 जानेवारी, मोहाली
दूसरा टी20 सामना : 14 जानेवारी, इंदौर
तीसरा टी20 सामना : 17 जानेवारी, बंगळुरु