मुंबई : दिपक चहर सध्या आपल्या खेळापेक्षा स्टेडियममध्ये जास्त मैत्रिणींना प्रपोज करण्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांतच, हा क्रिकेटपटू त्याच्या गर्लफ्रेंड जया भारद्वाजबद्दल इतका सिरीयस झाला की, त्याने तिला आपला जीवनसाथी बनवण्यास सहमती दर्शवली. आता सर्वांना माहीत आहे की, दीपकने धोनीच्या सांगण्यावरून लीग सामन्यादरम्यान जयाला कसं प्रपोज केले, पण माहीची स्वतःची प्रपोजची कथा काही कमी इंट्रेस्टींग नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका शो दरम्यान, धोनीने स्वत: ही संपूर्ण गोष्ट सर्वांसोबत शेअर केली. तिने सांगितलं होतं की, तो साक्षीला डेट करत असताना दोन वर्षे झाली होती. जेव्हा तो ऑस्ट्रेलियात सामने खेळायला गेला तेव्हा तो दिवस व्हॅलेंटाईन डे होता. या दिवशी दोघंही फोनवर बोलत होते आणि धोनीला साक्षीला किती आवडते हे त्याला व्यक्त करायचं होते, पण आय लव यू ऐवजी विल यू मॅरी मी असं थेट त्याच्या तोंडातून बाहेर पडलं. प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच त्याने साक्षीला लग्नाची मागणी घातली असल्याचं क्रिकेटपटूने म्हटलं होतं.


धोनी आणि साक्षी दोघांसाठीही हे थोडं आश्चर्यचकित झालं होतं. मात्र, जेव्हा तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल आणि तुम्ही त्याच्यासोबत तुमचं भविष्य पाहता, तेव्हा थेट लग्नाबद्दल बोलण्यात काहीच हरकत नाही. मात्र, हे लक्षात ठेवा की, जर दुसऱ्या व्यक्तीला याबद्दल अस्वस्थ वाटत असेल तर त्यांना प्रस्तावावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ द्या. लग्नाचा निर्णय हा एक मोठा निर्णय असतो. आणि हा निर्णय घाई किंवा कोणत्या दबावाखाली घेणं योग्य नाही.


आय लव यू म्हणण्याऐवजी महेंद्रसिंग धोनीने आपल्या मैत्रिणीला थेट लग्नासाठी प्रपोज केलं, पण विराट कोहलीच्या बाबतीतही तसं झालं नाही. हा क्रिकेटर बराच काळ अनुष्का शर्माला डेट करत होता. त्यांच्यातील नातेसंबंध इतके दृढ होते की, ब्रेकअपचा टप्पा देखील त्यांना फार काळ दूर ठेवू शकला नाही. एका इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये विराटने सांगितलं की, त्याने अनुष्काला कधीच प्रपोज केलं नाही. त्यांना या सगळ्याची कधीही गरजही वाटली नाही. कारण दोघांनाही माहित होतं की ते एकमेकांशी लग्न करतील.


हाच त्यांच्या नात्यातील आत्मविश्वास आहे. जेव्हा दोंघांनाही माहित आहे की, त्यांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील या नात्यासाठी बराच काळ सहमती दर्शवली आहे. तेव्हा प्रपोज करण्यासारखी गोष्ट फक्त औपचारिकता बनते. जेव्हा एखाद्या जोडप्याच्या मनात हे स्पष्ट होतं की, त्यांना लग्न करायचं आहे, तेव्हा त्यांनी दोन वर्षांच्या डेटिंगनंतर किंवा चार वर्षांनी लग्न केलं तरी काही फरक पडत नाही.


क्रिकेटर हार्दिक पंड्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची पद्धत फिल्मी सीनपेक्षा कमी नव्हती. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिवसभर एक मेकांसोबत वेळ घालवला. दोघंही समुद्रात बोटीवर होते तेव्हा हार्दिक एका गुडघ्यावर बसला आणि त्याने नताशाच्या बोटामधे अंगठी घालून नताशाला प्रपोज केलं. या रोमँटिक प्रपोजला कशी चांगली अभिनेत्री नाही म्हणेल.


असं समजू नका की, आपण प्रपोज केलं आहे आणि आपल्याला लगेच समोरुन होकार मिळेल. हरभजनच्या बाबतीत काहीसं असंच घडलं. 2014 मध्ये आयपीएल दरम्यान, या क्रिकेटपटूने त्याची मैत्रीण गीता बसराला प्रपोज केलं. मात्र त्यावेळी अभिनेत्रीने हे प्रपोज स्वीकारलं नाही. जवळजवळ सुमारे 11 महिन्यांनंतर, हरभजनला शेवटी गीताकडून होकार मिळाला आणि या दोघांनीही लगनगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.