मुंबई : इंदूरमधल्या दुसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेला हरवल्यानंतर भारतानं सीरिजही खिशात घातली. त्यानंतर आता आज भारतीय टीम टी-20 सीरिज ३-०नं जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये भारतीय स्पिनर्स युझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरच्या मॅचमध्ये कुलदीप यादवनं ३ विकेट घेतल्या. तर युझुवेंद्र चहलला ४ विकेट घेण्यात यश आलं. याआधी पहिल्या मॅचमध्येही चहलनं ४ विकेट घेतल्या होत्या. याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ४ विकेट घेणारा चहल हा पहिला भारतीय बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड अश्विनच्या नावावर होता. अश्विननं दोनवेळा ४ विकेट घेतल्या आहेत.


युझुवेंद्र चहलनं एका वर्षात ३ वेळा ४ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. असं करणारा तो जगभरातला पहिला खेळाडू आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारे १० खेळाडू आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीमध्ये चहल पहिल्या क्रमकांवर आहे.