हैदराबाद : टी-20 क्रिकेटमधला स्फोटक बॅट्समन युसुफ पठाण यावर्षी हैदराबादच्या टीमकडून खेळत आहे. राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात युसुफ मैदानात उतरला आणि रेकॉर्ड झाला आहे. टी-20 लीगमधली युसुफ पठाणची ही १५०वी मॅच आहे. याचबरोबर युसुफनं विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. या यादीमध्ये सुरेश रैना पहिल्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना १६२ टी-20 लीग मॅच खेळला आहे. युसुफ पठाण सुरुवातीला राजस्थानकडून मग कोलकात्याकडून आणि आता हैदराबादकडून खेळत आहे.


सर्वाधिक मॅच खेळणारे खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैना- १६२ मॅच


रोहित शर्मा/एम.एस.धोनी- १६० मॅच


दिनेश कार्तिक- १५३ मॅच


विराट कोहली/रॉबीन उथप्पा/ युसुफ पठाण- १५० मॅच