मुंबई : क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या वर्षी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरला आहे. यामुळे युसुफ पठाणवर ५ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. युसुफने ब्रोजिट नावाच्या औषधाचे सेवन केले होते. खोकल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचं युसुफनं सेवन केलं होतं, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. तसंच पुढच्यावेळी अशाप्रकारची औषधं घेण्यापासून सावध राहण्याचा इशाराही बीसीसीआयनं युसुफला दिला आहे.


तरी आयपीएल खेळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युसुफ पठाणनं १६ मार्च २०१७ला लघवीचा नमुना दिला होता. या नमुन्यांच्या चाचण्यांमध्ये युसुफ दोषी ठरवण्यात आला. पण युसुफचं निलंबन १५ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे १४ जानेवारीला युसुफचं निलंबन उठत आहे. म्हणून त्याला २७ आणि २८ तारखेला होणाऱ्या आयपीएल लिलावामध्ये सहभागी होता येणार आहे.


गेल्या काही मोसमांमध्ये युसुफ पठाण आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. लिलावाआधी कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंमध्ये केकेआरनं पठाणचा समावेश केला नाही. त्यामुळे युसुफ पठाणला लिलावाला सामोरं जावं लागणार आहे.