मुंबई: सिक्सर किंग नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या युवीने एक खास किस्सा सांगितला. यामध्ये टीम इंडियाची अनेक गुपितंही उघड केली.तर एक किस्सा सांगितल्या ज्याने युवीची झोपच उडाली आणि टेन्शन आली. सौरव गांगुली यांनी युवीची झोप उडवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या सामन्यात म्हणजे पदार्पणातच 84 धावा केल्या. 2000 आयसीसी नॉकआउट टूर्नामेंटमध्ये त्याने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली होते. 


युवराज सिंगने सांगितलं त्यावेळी मी 18 वर्षांचा होतो. सौरव गांगुलींनी ओपनिंगला उतरण्यासाठी तयार आहे का? त्यावर युवीने तुमचं हे मत असेल तर मी तयार आहे. मी असं म्हटलं खरं मात्र त्यानंतर टेन्शननं मला संपूर्ण रात्र झोप आली नाही असं युवीने सांगितलं. 


युवीने डेब्यू मॅचमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. हा सगळा फ्रँक असल्याचं त्याला नंतर समजलं. युवीसाठी पहिली मॅच तणावपूर्ण होती. मात्र त्यातही त्याने 84 धावांची उत्तम खेळी केली. टीम इंडियाने त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 265 धावा केल्या.