मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू युवराज सिंहने माजी कर्णधार विराट कोहलीला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. युवराजने कोहलीला गोल्डन शूज गिफ्ट केले आहेत. सोबतच त्याने विराटसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहीली आहे. या पोस्टमध्ये युवराजने विराटला सपोर्ट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवरून 3 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पहिला फोटो गोल्डन शूजचा आहे. दुसरा फोटोमध्ये त्याने विराटला लिहिलेलं पत्र आहे. आणि तिसरा आणि शेवटचा फोटो हा त्या दोघांचा असून तो फार जुना फोटो आहे. 


या पोस्टमध्ये युवराजने लिहिलंय की, 'हे गिफ्ट दिल्लीच्या त्या छोट्या मुलासाठी आहे ज्याने सर्वात चांगलं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी हे स्पेशल शूज तुला देऊ इच्छितो. मी आशा करतो की तु जस आहेस तसाच रहा, जसा खेळतोस तसाच खेळ आणि देशाची मान उंच कर.' तू माझ्यासाठी नेहमी चिकूच राहशील आणि जगासाठी किंग कोहली, असंही युवराजने म्हटलंय.



विराटने टी-20 वर्ल्डकपपूर्वी कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी त्याचं वनडे टीमचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. शिवाय दक्षिण आफ्रिकेची टेस्ट सिरीज हरल्यानंतर त्याने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. जवळपास गेल्या 2 वर्षांपासून कोहलीने एकंही शतक झळकावलेलं नाही.