११ वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलाला युवराजने दिला विश्वास
पंजाबचा खेळाडू युवराज सिंगने गुरूवारी आपला ११ वर्षाचा फॅन रॉकीची भेट घेतली. रॉकी गेली १० वर्ष ब्लड कॅंसरशी झुंझतोय. रॉकीचे बोन मेरो ट्रान्सप्लांट होणार असून त्याला शुक्रवारी भरती केल जाईल. मुलाचा आत्मविश्वास पाहता युवराजदेखील त्याचा फॅन झाला. दोघांनी हस्तांदोलन केलं. तसेच युवराजने त्याला बॅग, टी शर्ट आणि कॅप दिली.
इंदौर : पंजाबचा खेळाडू युवराज सिंगने गुरूवारी आपला ११ वर्षाचा फॅन रॉकीची भेट घेतली. रॉकी गेली १० वर्ष ब्लड कॅंसरशी झुंझतोय. रॉकीचे बोन मेरो ट्रान्सप्लांट होणार असून त्याला शुक्रवारी भरती केल जाईल. मुलाचा आत्मविश्वास पाहता युवराजदेखील त्याचा फॅन झाला. दोघांनी हस्तांदोलन केलं. तसेच युवराजने त्याला बॅग, टी शर्ट आणि कॅप दिली.
रॉकी आपली आई हर्षा, बहिण मोना आणि वडिल निशांत दुबेसोबत रॉकी होळकर स्टेडियममध्ये पोहोचला. पुढचे सहा महिने तो हॉस्पीटलमध्ये राहणार आहे. युवराजच्या भेटीनंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. युवराजदेखील फेफड्यांच्या कॅन्सरशी झुंजला आहे. त्यामुळे मुलाचा त्रास तो चांगला समजू शकतो. त्याने रॉकी आणि त्याचे वडिलांचा विश्वास वाढविला. खासकरुन मुलासमोर घाबरू नका, दु:खी होऊ नका असे त्याने रॉकीच्या वडिलांना सांगितले.
मला पण युवराजसारख खेळायचय
मलापण युवराजप्रमाणे खेळायच आहे असे रॉकीने यावेळी सांगितले. युवराजने ६ बॉलवर ६ सिक्स मारले होते त्यामुळे तो मला आवडतो असेही तो म्हणाला. आजारामुळे रॉकी शाळा पूर्ण करु शकत नाही. स्टॅमिना कमी असल्याने तो सर्वसामान्य मुलांप्रमाणे क्रिकेटही खेळू शकत नाही. त्याला त्याच्या आजाराबद्दल माहित नसल्याचे त्याची आई हर्षा सांगते.