Yuvraj Singh On No 4 Position: येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा शंखनाद होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) भारतात खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. तब्बल 12 वर्षानंतर वनडे वर्ल्ड कप भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाचे खेळाडू देखील कसून तयारी करत असल्याचं दिसतंय. मात्र, वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया (Team India) कशी असेल? यावर प्रश्नचिन्ह कायम आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघातील क्रमांक 4 ची जागा... अशातच तब्बल 16 वर्ष टीम इंडियाच्या क्रमांक 4 च्या जागेवर अधिराज्य गाजवणाऱ्या सिक्सर किंग आणि वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह (Yuvraj Singh) याने मोठं वक्तव्य केलं आहे.


काय म्हणतो सिक्सर किंग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला माहितीये की रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या फॉर्ममध्ये नाहीये. मागल्या वर्ल्ड कपवेळी म्हणजे 2019 मध्ये तो आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. तेव्हा मी त्याला म्हटलं की, तुझ्यात काही खास आहे आणि काहीतरी चांगलं होणार आहे. त्यामुळं तू फक्त चांगल्या फॉर्ममध्ये रहा. त्यानंतर त्याने वर्ल्ड कपमध्ये 4 ते 5 शतक ठोकले. आत्ताही त्याचा फॉर्म चांगला नाहीये, पण मला विश्वास आहे की, तो वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल.


नंबर 4 वर कोण खेळणार?


जर ऋषभ पंतला दुखापत झाली नसती तर तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकला असता. मात्र, चार आणि पाच नंबरवर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मला वाटतं ती केएल राहुलला नंबर 4 वर खेळवलं जाऊ शकतं. तर तुम्ही सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूला 5 वर खेळवू शकता. जो खेळाडू क्रमांक 4 वर खेळतो, त्याला डबल रोल तयार करावा लागतो. त्या खेळाडूला इनिंग तयार पण करावी लागते आणि शेवट देखील करावा लागतो. त्यामुळे या नंबरवर जो कोणी खेळेल, तो मॅचविनर असेल, असं वर्ल्ड कप जिंकवून देणारा युवराज सिंह म्हणतो.


आणखी वाचा - 'MS Dhoni चांगला कॅप्टन होता, पण...',Yuvraj Singh ने दाखवला टीम इंडियाला आरसा!


दरम्यान, 2011 चा वर्ल्ड कप युवराजच्या अफलातून कामगिरीमुळे भारताच्या पारड्यात पडला. विजयाचं श्रेय लाटण्यासाठी अनेक चर्चा झाल्या. मात्र, युवराज कधी त्या भानगडीत पडला नाही. तब्बल 18 वर्ष टीम इंडियामध्ये खेळणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही. रोहित दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं म्हणत युवीने (Yuvraj Singh On Rohit Sharma) सिलेक्टर्सला सल्ला दिला होता.