नवी दिल्ली : ७ एप्रिलापासून आयपीएल २०१८ च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सर्वच खेळाडुंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीमचं थीम साँग आणि जाहीरात शूट करण्यात येत आहे. त्यासोबतच खेळाडुंनीही आयपीएलसाठी आपल्या लूकमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय


केसांना पिवळा रंग दिला तर चालेल का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लूक बदलण्यासंदर्भात सर्वातआधी महेंद्र सिंग धोनी याचं नाव समोर आलं होतं. हेअरस्टायलिस्ट सपना मोती भवनानीने आपल्या अधिकृत ट्विटर वरुन धोनीचा एक फोटोही शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना सपनाने चाहत्यांकडून सल्लाही मागितला होता. सपनाने चाहत्यांना विचारला होता की, कॅप्टन कूलच्या केसांना पिवळा रंग दिला तर चालेल का?


विराटने बदलला लूक


धोनी नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन विराट कोहलीने सुद्धा आपली हेअरस्टाईल बदलली आहे. विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट करत नवा लूक शेअर केला होता. स्टायलिश लूकमुळे चर्चेत असणाऱ्या कोहलीने फोटो शेअर करत म्हटलं की, 'स्टाईल मास्टर आलिम हाकिमने खूपच चांगली हेअरस्टाईल केली आहे.' या नव्या लूकमध्ये विराटने साईडने केस बारीक कापले आहेत.


IPLमध्ये युवराजचा पहा नवा लूक


आता महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीच्या नंतर युवराज सिंगही आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०१८ मध्ये युवराज नव्या लूकमध्ये दिसणार आहे. यासाठी युवराज सिंह सुद्धा हेअरस्टायलिस्ट आलिम हाकिमकडे पोहोचला.


...म्हणून युवराजने मागितली माफी


युवराजने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर नव्या लूकसह फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना युवराजने म्हटलयं, माझ्या लांब केसांसोबतच माझी मोठी लढाई संपली आहे. आता नव्या लूकची वेळ आली आहे.


यासोबतच युवराजने लिहीलं आहे की, "सॉरी केएल राहुल, अंगद बेदीने मला केस कापण्यास भाग पाडलं. हेअरकट केल्याबद्दल आलिम हाकिम खूप खूप धन्यवाद."



युवराज सिंहच्या या पोस्टवर केएल राहुलनेही कमेंट केली आहे. "नाही... तु असं करु शकत नाही युवराज सिंग, मला वाटतं होतं की आयपीएल दरम्यान तुझ्या केसांची स्टाईल करेल."