Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय; भारत नाही तर आता `या` देशाच्या टीमकडून क्रिकेट खेळणार
Team India News: वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहलचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाहीये. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. अशातच आता चहलने मोठा निर्णय घेतला आहे.
Team India News: एशिया कप ( Asia cup 2023 ) संपल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकपचा ( ICC world cup ) पहिला सामना खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी टीम इंडियाने स्क्वॉडची घोषणा केली आहे. 15 जणांच्या या स्क्वॉडमध्ये टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहलचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाहीये. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. अशातच आता चहलने मोठा निर्णय घेतला आहे.
वर्ल्डकपमध्ये संधी न मिळाल्याने आता टीम इंडियाच्या ( Team India ) या क्रिकेटपटूने एक मोठा निर्णय घेतलाय. यानुसार तो दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. लेग-स्पिनर युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) ची 2023 च्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. यानंतर त्याने आता काउंटी चॅम्पियनशिपचे तीन सामने खेळण्यासाठी इंग्लिश काऊंटी टीम केंटशी करार केला आहे.
युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय
युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) केंटच्या घरच्या मैदानावर नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायरविरुद्धच्या सामन्यांसाठी आणि सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. काऊंटी टीमच्या निवेदनात युझवेंद्र चहल म्हणाला, 'इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणं हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. मी यासाठी प्रचंड खूप उत्सुक आहे.'
युझवेंद्र दुसरा भारतीय खेळाडू
युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) हा केंटकडून खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या टीमकडून खेळला होता. चहलने जून-जुलैमध्ये कॅन्टसाठी पाच सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 13 विकेट घेतल्या होत्या. अर्शदीपने त्यावेळी सर्व सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली होती.
वर्ल्डकपच्या टीममधून युझवेंद्रला डच्चू
मंगळवारी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट स्पिनर युझवेंद्र चहलला टीममधून वगळण्यात आलं आहे. इतकंच नाही तर युझवेंद्र चहलने या वर्षात फक्त दोन वनडे खेळलेत. युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal ) भारताकडून 72 वनडे सामन्यात 121 विकेट घेतल्यात. दरम्यान सध्या सुरु असलेल्या एशिया कपमध्येही युझवेंद्रला ( Yuzvendra Chahal ) संधी देण्यात आली नाहीये.
वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.