मुंबई : बंगळुरुचा स्टार युझवेंद्र चहलने खूप कमी वेळात नाव कमवलं आहे. भारतीय टीममध्ये देखील त्याचं स्थान जवळपास पक्कं झालं आहे. दक्षिण आफ्रिकेत चहलने चांगली कामगिरी केली. ज्यामुळे टीम इंडिया विजयी झाली. युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. एका अभिनेत्रीसोबत त्याचं नाव घेतलं जातंय. या अभिनेत्रीवर तो खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत विवाह देखील करणार असल्याच्या चर्चा आहेत.


कोण आहे ती अभिनेत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरच्या प्रेमात चहल असल्याच्या चर्चा आहेत. हे दोघे विवाह देखील करु शकतात अशी चर्चा रंगू लागली आहे. तनिष्का कन्नड सिनेमांमधील सुंदर अभिनेत्री आहे.



लग्नाबाबत चर्चा


तनिष्काने कन्नड सिनेमा फर्स्ट रँक राजू या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. तनिष्का कपूर आणि युजवेंद्र एकदुसऱ्याला सध्या खूप वेळ देत आहेत. अनेकदा दोघांना सोबत पाहिलं गेलं आहे. त्यामुळे आता ही जोडी देखील विवाह करते का अशी चर्चा आहे.