मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांनी आपल्या आजूबाजूची लोक आपल्या घरातील जवळचे लोक गमावले आहेत. क्रिकेट विश्वावरही कोरोनाचं मोठं संकट आहे. चेतन साकरिया, पीयूष चावला यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. आता टीम इंडियातील प्रसिद्ध खेळाडू युजवेंद्र चहलच्या घरात कोरोना शिरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विन पाठोपाठ आता युजवेंद्र चहलचं टेन्शन देखील वाढलं आहे. युजवेंद्रची पत्नी धनश्रीच्या आई-भावाला आधी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी धनश्री बायो बबलमध्ये होती. आता IPL स्थगित झाल्यामुळे सर्वजण घरी परतले असताना आता युजवेंद्रच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरून याची माहिती दिली.




 




युजवेंद्र चहलच्या वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर आईवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. युजवेंद्र आणि धनश्रीसाठी हा काळ किती कठीण आहे हे तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.


'माझी आई आणि भाऊ दोघांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र मी माझ्या काकूला या आजारात गमवून बसले आहेत. आता माझे सासू-सासरे म्हणजे युजवेंद्रचे आई-बाबा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं आढळून आल्यानं त्यांची चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. तुम्ही घरीच राहा आणि काळजी घ्या', असं आवाहनही धनश्रीने यावेळी केलं आहे.