मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक्टिव्ह असतात. क्रिकेटपटूही याबाबतीत अपवाद नाहीत. सोशल मीडियावरील चाहते आणि फॉलोअर्सशी कनेक्ट राहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, कधी-कधी या सोशल मीडियामुळे अनेक सेलेब्सना काहीवेळा पेच सहन करावा लागतो. असंच इन्स्टाग्रामवर खूप एक्टिव्ह असलेला भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलला देखील एकदा याचा सामना करावा लागला होता.


या प्रकरणात युजवेंद्र चहलने एका मुलीला त्याच्या पर्सनल आयडीवरून मेसेज केला होता आणि मुलीने तो मेसेज आता पब्लिक केला होता. यामध्ये मुलीने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मुलगी रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पोज देताना दिसली. 


दरम्यान या मुलीच्या फोटोवर युझवेंद्र चहलच्या इन्स्टाग्राम आयडीवरून एक मेसेज करण्यात आला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं, नाईस वन!



या मुलीने युझवेंद्र चहलच्या या मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये ही मुलगी म्हणते '1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला क्रिकेटर मला मेसेज का करतोय?' 


मुलीने रिप्लाय देताना असं म्हटलंय की, 'जर तुम्हाला वाटत असेल की ती मुलगी मी आहे, तर तसं नाही...' ज्याला चहलने उत्तर देताना म्हटलंय, 'मला माफ करा माझ्या मित्राने तुम्हाला मेसेज केला, मी तुम्हाला मेसेज केला नाही.'