मुंबई : गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममुळे बाहेर होता. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये कमालीची कामगिरी केली. युजवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्सही घेण्याचा विक्रम केला आहे. त्याची कामगिरी पाहता पुन्हा टी 20 साठी त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्र चहलची आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. यंदाच्या हंगामात सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. मात्र पर्पल कॅपची त्याची जागा धोक्यात आहे. त्याच्या पर्पल कॅपवर कोणाची नजर कोण खेळाडू हिसकावून घेणार जाणून घेऊया. 


चहलसाठी कुलदीप नाही तर कगिसो रबाडा धोक्याचा ठरत आहे. कुलदीप यादवपेक्षाही घातक बॉलिंग करणाऱ्या कगिसोला पर्पल कॅपवर आपलं नाव कोरायचं आहे. त्याने 9 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. कगिसो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कुलचा जोडीसाठी ही धोक्याची घंटा आहे. 


युजवेंद्रला जरी पर्पल कॅप मिळाली तरी मी खूश असेल असं कुलदीप यादवने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या दोन खेळाडूंच्या स्वप्नांना कगिसो रबाडा आता सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. 


युजवेंद्र चहलने 10 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर रबाडाने 9 सामन्यात 17 विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर कुलदीप यादवने 10 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. टी नटराजनही या स्पर्धेत आहे. त्याने 17 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.