लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला. जो रुटनं केलेल्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं ५० ओव्हरमध्ये ३२२ रन केल्या. इंग्लंडनं ठेवलेल्या या धावसंख्येचा पाठलाग भारताला करता आला नाही आणि कोहलीच्या टीमचा ८६ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये युझवेंद्र चहलनं भारतीय ड्रेसिंग रूमकडे केलेला इशारा पाहून कोहलीसोबतच भारतीय टीमलाही हसू आवरलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझवेंद्र चहलनं डेव्हिड विलीच्या बॉलिंगवर स्ट्रेड ड्राईव्ह फोर मारली. चहली वनडे क्रिकेटमधली ही पहिली फोर होती. फोर मारल्यानंतर चहलनं ड्रेसिंग रूमकडे बघून बॅट दाखवली. यानंतर चहलसोबत मैदानात असलेल्या कुलदीप यादवही हसायला लागला.


युझवेंद्र चहलनं २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेमधून पदार्पण केलं होतं. आत्तापर्यंतन त्यानं २५ वनडेमध्ये ४.७५ च्या इकोनॉमीनं ४५ विकेट घेतल्या आहेत. तर २६ टी-२० मॅचमध्ये चहलनं ४२ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याची इकोनॉमी ७.८५ आहे.