मुंबई: IPL 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. 25 दिवस हे सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारा भारताचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा 14 वा सीझन भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्यामुळे मध्यभागी थांबला होता. हे सामने सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांआधी युजवेंद्रने धक्कादायक खुलासा केला आहे. किंग कोहलीचा संघाकडून RCB कडून खेळणारा युजवेंद्रने कॅप्टन कूल धोनीच्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


क्रिकट्रॅकरशी बोलताना विचारलेल्या एक प्रश्नाचं उत्तर देताना युजवेंद्रने हा खुलासा केला आहे. RCB ऐवजी इतर कोणत्या टीममधून तुला खाळायला आवडेल असा प्रश्न विचारल्यानंतर युझीने कॅप्टन कूल धोनीची चेन्नई सुपरकिंग्स असं कोणतंही वेळ न दवडता उत्तर दिलं. 


IPL 2021च्या 14 व्या हंगामात युजवेंद्र चहलची कामगिरी ठिक राहिली आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल स्थगित झाल्यानंतर युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोना झाला होता. तर आयपीएलदरम्यान पत्नी धनश्रीच्या माहेरच्या माणसांना कोरोनाची लागण झाली होती. 


बायो बबलमध्ये कोरोना शिरल्यामुळे 4 मे रोजी आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. आता हे स्थगित केलेले उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान UAEमध्ये खेळवले जाणार आहेत. त्याच्या तारखा आणि संपूर्ण शेड्युल अद्याप येणं बाकी आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या युझीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.