युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घरी खुशखबर, चाहत्यांसोबत शेअर केला खास फोटो
युजवेंद्र चहलनं खास क्षणाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. या बातमीनं दोघंही खूप खूश आहेत.
मुंबई: टीम इंडियासा स्पिनर सध्या आपल्या पत्नीसोबत वेळ घालवत आहे. यावेळी त्याने आपल्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे.
युजवेंद्र आणि धनश्री या बातमीने खूपच खूश आहे. युजवेंद्र चहलचे आई-वडील कोरोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतले आहेत. याचा आनंद दोघांनाही झाला आहे. काही दिवसांपूर्वी युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर यशस्वीपणे मात करून दोघंही घरी आल्याने युजवेंद्रला आनंद झाला आहे.
युजवेंद्रने आपल्या इन्स्टाग्रामवर पूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करून तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. आई-वडील सुरक्षित असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचं त्याने चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
धनश्री आणि युझीने आपल्या चाहत्यांसोबत कोव्हिड काळ कसा गेला यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या होता. कोव्हिडीमुळे 4 मे रोजी आयपीएलचे सामने देखील स्थगित झाले होते. आता उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान UAEमध्ये तीन शहरांमध्ये होणार आहेत.