मुंबई: युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी आपल्या डान्सनं चाहत्यांच्या मनावर भुरळ घातले तर कधी आपल्या फोटोंनी. तिच्या फोटोंना सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. नुकताच धनश्रीने आपल्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्य़ानंतर आता एक फोटो अपलोड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री वर्माच्या या दिलखेच अदा चाहत्यांचा मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत .तिचे डोळे यामध्ये खूपच सुंजर दिसत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. 




धनश्री वर्माचा स्वॅग बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल्स पेक्षा काही कमी नाही. कायमच आपल्या डान्सच्या व्हिडीओने ती चाहत्यांची मनं जिंकत असते. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे ज्यावर ती डान्सचे व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. तिच्या डान्सच्या व्हिडीओला देखील खूप लाईक्स आणि कमेंट्स चाहते सातत्यानं करत असतात. 


क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने डिसेंबर 2020मध्ये लग्न केलं. काही दिवसांपूर्वी धनश्रीच्या कुटुंबातील आणि युजवेंद्रचे आई-वडील कोरोनाशी लढा देत होते. त्यातून सावरताना काय वेदना होतात ते धनश्रीने शेअर केल्या होत्या.