Lucknow super giants Mentor : इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी (IPL 2025) भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या झहीर खानची लखनऊ सुपर जायएन्ट्सच्या मेन्टॉरपदी नियुक्ती झाली आहे. लखनऊ सुपर जायट्ंसने याची अधिकृत घोषणा केली. लखनऊ सुपर जायट्ंसने आपल्या अधिकृत खात्यावरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा मेन्टॉर होता. तर लंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलने देखील संघातून बाहेर गेल्याने लखनऊच्या संघाला मोठा फटका बसला होता. मयंक यादव सारखे तगडे गोलंदाज असून देखील लखनऊला याचा फायदा घेता आला नाही. अशातच आता झहीर खान कोच नाही तर मेन्टॉर झाल्याने लखनऊला फायदा होऊ शकतो. 


झहीर खानने 10 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या तीन फ्रँचायझींचा भाग म्हणून 100 IPL सामन्यांमध्ये भाग घेतला आहे, ज्याने 7.59 च्या इकॉनॉमीमध्ये 102 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खान याआधी मुंबई इंडियन्सचे क्रिकेट संचालक होता. 2018 ते 2022 पर्यंत त्यांनी मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट संचालकपद भूषवले. याशिवाय माजी भारतीय गोलंदाज ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रमुख देखील होता.


LSG चा कॅप्टन कोण?


लखनऊ सुपर जाएन्ट्सने केएल राहुल याची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, मागील काही वर्षांचा संघाची कामगिरी पाहता लखनऊ केएल राहुलला रिलीज करेल, अशी शक्यता होती. मात्र, आता केएल राहुल लखनऊसोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण केएल राहुल हा एलएसजीचे कुटुंबातील सदस्य आहे, असं वक्तव्य लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी म्हटलं आहे.