मुंबई: 18 वर्ष आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळेल अशी वाट पाहणाऱ्या बॉलरला आज अखेर संधी मिळाली आहे. आयसीसी आणि पाकिस्तानने त्याचा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. हा खेळाडू वयाच्या 36 व्या वर्षात आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये डेब्यू करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्बे आंतरराष्ट्रीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान संघात 36 वर्षीय ताबिश खानने डेब्यू केलं आहे. संघात त्याचं मोठ्या जल्लोषात स्वगत झालं. 


ताबिशच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलताना त्याने 18 वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये ताबिशने 137 सामने खेळले आहेत आणि शानदार गोलंदाजी करत त्याने 598 विकेट्स घेतल्या आहेत. ताबिशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याचबरोबर शेवटच्या दोन प्रथम श्रेणी सत्रात ताबिशने 25 आणि 30 गडी बाद केले. 




कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्यांपैकी 36 वर्षीय ताबिश हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी आयर्लंडने टीम मुतर्घला 2018 मध्ये पहिल्या कसोटीत संधी देण्यात आली होती. पाकिस्तानी संघात खालिद इबादुल्लाह हा एकमेव खेळाडू आहे जो पाकिस्तानकडून पदार्पण करण्यापूर्वी सर्वाधिक प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. पाकिस्तानकडून कसोटी सामन्यात पदार्पण करण्यापूर्वी इबादुल्लाने 218 प्रथम श्रेणी सामने खेळले होते.