Zimbabwe vs India : झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात जुलैमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका (T20I series) होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट (Zimbabwe Cricket) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी जाहीर केलं की, हरारे येथे 6-14 जुलै दरम्यान पाच सामन्यांची T20I मालिका खेळवली जाईल. ही मालिका 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणाऱ्या वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही जुलैमध्ये भारतासोबत T20I मालिकेचे यजमानपद भूषवताना खूप आनंदित आहोत, जे यावर्षी आमचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय आकर्षण असेल, असं झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी म्हणालं आहे. क्रिकेट खेळाला नेहमीच भारताचा प्रभाव आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचा खूप फायदा झाला आहे आणि मी पुन्हा एकदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वचनबद्ध केल्याबद्दल बीसीसीआयचे खूप आभार मानू इच्छितो, असंही ते म्हणाले.


जय शाह काय म्हणतात...


बीसीसीआयने जागतिक क्रिकेट समुदायामध्ये योगदान देण्यासाठी नेहमीच अग्रणी भूमिका बजावली आहे. आम्ही समजतो की झिम्बाब्वेच्या पुनर्बांधणीचा हा काळ आहे आणि झिम्बाब्वे क्रिकेटला या क्षणी आमच्या समर्थनाची गरज आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, झिम्बाब्वे द्विपक्षीय T20I मालिकेत भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल, यापूर्वी 2010, 2015 आणि 2016 मध्ये मालिका खेळल्या गेल्या होत्या.


जाणून घ्या वेळापत्रक  (India tour of Zimbabwe 2024) 


६ जुलै - पहिली ट्वेंटी-२०, हरारे
७ जुलै - दुसरी ट्वेंटी-२०, हरारे
१० जुलै - तिसरी ट्वेंटी-२०, हरारे
१३ जुलै - चौथी ट्वेंटी-२०, हरारे
१४ जुलै - पाचवी ट्वेंटी-२०, हरारे


दरम्यान, झिम्बाब्वे द्विपक्षीय T20I मालिकेत भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल, यापूर्वी 2010, 2015 आणि 2016 मध्ये मालिका खेळल्या गेल्या होत्या. त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या खेळीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या सिरीजमध्ये सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे सर्व गट सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. तर सर्वांना प्रतिक्षा असलेला भारत आणि पाकिस्तान सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आयसीसीने टी-20 विश्वचषकासाठी तिकीट प्रक्रियाही जाहीर केलीये. चाहत्यांना 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान तिकिटांसाठी अर्ज करावा लागणार आहे. तर 22 फेब्रुवारीपासून तिकीट विक्री साधारणरित्या सुरू होईल.