Zimbabwe Cricket News : वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या झिबॉब्वे संघाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) क्वालिफाय करता आलं नाही. युंगाडाने झिबॉब्वेच्या स्वप्नांची राख रांगोळी केली होती. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जरी झिम्बाब्वे खेळणार नसली तरी आता झिम्बाब्वे संघाला (Zimbabwe National Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वे संघातील दोन स्टार खेळाडूंवर 4 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या खेळाडूंवर कारवाई का झाली? याची कारण पाहुया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने वेस्ली माधवेरे (Wesley Madhevere) आणि ब्रँडन मावुता (Brandon Mavuta) यांच्यावर बंदी घातली आहे. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. या दोन्ही क्रिकेटपटूंची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात डोप चाचणी करण्यात आली होती. या डोप टेस्टमध्ये दोन्ही खेळाडू पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे दोन्ही क्रिकेटपटू 4 महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीत.


एवढंच नाही तर वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांना त्यांच्या पगाराच्या 50 टक्के दंड भरावा लागणार आहे. झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डाने (Zimbabwe Cricket Board) याबाबत एक निवेदन जाहीर केलंय. त्यात काय म्हटलंय? पाहा...


झिम्बॉब्वे क्रिकेट ड्रग्ज आणि बंदी असलेल्या ड्रग्जवर शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करतं. आमच्या समितीला असं आढळून आलं की वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांनी अंमली पदार्थ सेवन केलं आहे. त्यामुळे हा गंभीर गुन्हा असून, दोन्ही क्रिकेटपटूंनी नियम मोडले आहेत. वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यामुळे आमचं नाव खराब झालंय, असं झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


दरम्यान, झिम्बॉब्वे संघाने वनडे वर्ल्ड कपमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाविरुद्ध देखील झिबॉब्वेच्या खेळाडूंनी मैदानात नांगर टाकला होता. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनाची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता आगामी काळात झिम्बॉब्वे संघ चांगली उभारी घेईल, अशी चर्चा क्रिडाविश्वात होताना दिसते.