मुंबई: झिम्बाब्वेच्या फलंदाजाने भीषण वास्तव समोर आणल्यानंतर तो मोठ्या अडचणीत आला आहे. त्याने आपल्या फाटलेल्या शूटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मदतीचा हात मागितला होता मात्र त्याला हे मदतीचं आवाहन करण चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आता झिम्बाब्वे बोर्ड त्याला संघातून काढण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वेचा फलंदाज रेयान बर्लने ट्वीटरवर फाटलेल्या शूजचे फोटो शेअर करत भयाण वस्ताव सांगितलं. मैदानात हे शूज गमने चिकटवून किंवा त्याला शिवून वापरण्याची वेळ संघावर आल्याचं वास्तव त्याने मांडलं. ही अवस्था पाहून प्यूमा कंपनीने त्यांना स्पॉन्सर्स करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रेयानने त्यांचे आभार मानले.


या सगळ्या प्रकारानंतर झिम्बाब्वे बोर्डमध्ये मात्र खळबळ उडाली. संघाचं भीषण वास्तव जगासमोर आल्यानंतर रेयान बर्लचं क्रिकेटमधील करियर धोक्यात येण्याची वेळ आली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे अशीही माहिती मिळाली आहे. 



झिम्बाब्वेचा पत्रकार एडम थियो याने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रेयाननं केलेल्य़ा ट्वीटमुळे बोर्डचे अनेक लोक नाराज आहे. त्याच्या ट्वीटमुळे बोर्डच्या इमेजला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला संघातून काढण्यापर्यंत देखील कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचं त्याने म्हटलं आहे. 




रेयाननं आपल्या फाटलेल्या शूटचे फोटो शेअर करत तिथलं वास्तव आणि खेळाडूंची अवस्था सांगणारं ट्वीट केलं होतं. त्यानंतर प्यूमा कंपनीने त्यांना मदतीचा हात दिला मात्र अशा पद्धतीनं रेयानचं वागणं झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डला न आवडल्यानं आता त्याचं करियर धोक्यात येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.