मुंबई : दुसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेने 18 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यातील विजय झिम्बाब्वेसाठी विशेष होता कारण टी-20 क्रिकेटमध्ये या संघाने प्रथमच पाकिस्तानला पराभूत केले. झिम्बाब्वेपेक्षाही पाकिस्तानचा संघ मजबूत आहे, पण या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाला पराभवाचा धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 118 धावा केल्या. या संघासाठी सलामीवीर फलंदाज तिनाशे कमुनहुकामवे यांना सर्वाधिक 34 रन केले. तर कर्णधार ब्रॅंडन टेलरने अवघ्या 5 धावा केल्या. याशिवाय चबाभाने 18 धावा, मेधेवरेने 16 धावा आणि मुरामाणीने 13 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज काही खास काम करू शकले नाहीत. पाकिस्तानची गोलंदाजी चांगली होती आणि संघाच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला अत्यंत कमी धावांवर रोखले. पाकिस्तानचा मोहम्मद हसनैन व दानिश अझीझ यांना प्रत्येकी दोन, तर फहीम अशरफ, अरशद इक्बाल, हॅरिस राऊफ आणि उस्मान कादीर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


पाकिस्तानला विजयासाठी फक्त 119 धावांचे सोपे लक्ष्य होते, परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत संघाला 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट करत 99 धावांवर बाद केले. झिम्बाब्वेकडून ल्यूक जोंगवेने 4 विकेट घेतल्या. तर रेयान बर्टला दोन विकेट मिळाल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने 41 धावांची खेळी खेळली, पण तो संघाला जिंकू शकला नाही. बाबरशिवाय दानिश अजीजने 22 धावा केल्या तर मो. रिझवानने 13 धावांची खेळी केली. संघातील अन्य 8 फलंदाज दहाचा आकड्यावर देखील जावू शकले नाही. या सामन्यात लूक जोंगवे त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे मॅन ऑफ द मॅच ठरला.