मुंबई : सुरेश रैनाची मुलगी ग्रेसिया 2 वर्षाची आहे . 14 मे रोजी ग्रेसियाचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा झाला. आयपीएलच्या दरम्यान चैन्नई संघाने ग्रेसियाचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला चैन्नई संघातील खेळाडू आणि त्यांचा परिवार सहभागी झाला होता. अशावेळी महेंद्र सिंह धोनीची मुलगी जीवा, सुरेश रैनाची मुलगी ग्रेसिया आणि हरभजन सिंहची मुलगी हिनाया यांच्यात देखील चांगली मैत्री झाली. 


जीवा, ग्रेसिया आणि हिनाया हे आपल्या वडिलांप्रमाणेच बेस्ट फ्रेंड्स बनले आहेत. या तिघींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक जीवा आणि ग्रेसियाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चैन्नई संघाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संघाचा खेळाडू ड्वेन ब्रावो आपल्या मुलांसाठी चॅम्पिअन हे गाणं गात आहे. आणि या गाण्यावर ग्रेसिया आणि जीवासोबत डान्स करत आहे.