मुंबई : जर तुम्ही एसयुवीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेनॉ डस्टरवर २.१७ लाख रुपयांचा डिस्‍काउंट आहे. या डिस्‍काउंटचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी गँग ऑफ डस्‍टरचं सदस्‍य बनावं लागेल. ही डिसकाउंट ऑफर रेनॉ डस्टर बेस डिझेलच्या AWD Adventure वेरिएंटवर दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डस्टर बेस डीजल मॉडलवर कंपनी 10,000 रुपये एक्सचेंज ऑफर आणि 7000 रुपये कॉरपोरेट बोनससह 1.6 लाखांचा डिस्काउंट देत आहे. हा बेस डिझेल मॉडल फक्त 34 यूनिटवकर ही ऑफर आहे. फक्त पांढऱ्या रंगामध्ये ती उपलब्ध आहे.


Renault Duster AWD वेरिएंटवर कंपनी 2 लाखाचा डिस्‍काउंट देत आहे. शिवाय 10,000 रुका एक्सचेंज ऑफर आणि 70000 कॉरपोरेट बोनस देत आहे. Duster च्या या वेरिएंटवर 73 यूनिट स्टॉकमध्ये आहे. ज्यामध्ये 58 पांढऱ्या आणि १५ सिल्वर रंगात त्या उपलब्ध आहेत.


Duster वर मिलणारी ही डिसकाउंट ऑफर वास्‍तवात क्लियरेंस सेलसाठी आहे. रेनॉ सणांच्या दिवसांमध्ये नवी SUV कॅप्‍टर लॉन्‍च करणार आहे.