मुंबई : होंडानं भारतीय बाजारामध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे. ही कंपनीची सीबी शाईन एसपी कम्प्यूटर मोटरसायकल आहे. होंडाच्या सीबी शाईनचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. कंपनीनं या मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. होंडानं सीबी शाईनचं अपडेटेड व्हर्जन ऑटो एक्सपो २०१८मध्ये सादर केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडा शाईन १२५ सीसी बाईक आहे. शाईनच्या ड्रम व्हेरियंटची किंमत ६२,०३२ रुपये एवढी आहे. तर डिस्क व्हर्जन ६४,५१८ रुपये आणि सीबीएस व्हेरियंटची किंमत ६६, ५०८ रुपये आहे.


होंडा सीबी शाईनची स्पर्धा बजाज डिस्कव्हरसोबत होईल, असं बोललं जातंय. होंडा सीबी शाईनमध्ये नवीन टँक डिझाईन आणि नवीन बॉडी डेकल्स देण्यात आले आहेत. होंडा शाईनच्या नव्या व्हेरियंटमध्ये अपडेटे एनॉलॉग डिजीटल इंस्ट्रूमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये सर्व्हिस इंडिकेटर आणि घड्याळ आहे.


१०.३० एनएम टॉर्क


बाईकचं साईड पॅनल, टेल सेक्शन आणि एलॉय व्हील्स कम्यूटर पहिल्यासारखेच आहेत. होंडा सीबी शाईन एसपीमध्ये १२४.७३ सीसीचं सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. बाईकचं इंजिन ७,५०० आरपीएम वर १०.१६ बीएचपी पॉवर आणि ५,५०० आरपीएमवर १०.३० एनएमचं टॉर्क जनरेट करतं. इंजिन ५ स्पीड गियरबॉक्स असलेलं आहे. कंपनीनं बाईकच्या बेस व्हेरियंटमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. याचबरोबर बाईक डिस्क ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिमही देण्यात आली आहे. बाईकला १८ इंचांचे एलॉय व्हील्स लावण्यात आले आहेत.