मुंबई: कावासाकी निंजा ZX-10R (२०१८) या सुपरबाईकचे अधिकृत बुकींग भारतातही सुरू झाले आहे. बाईक बुकींगची कमीत कमी किंमत ३ लाख रूपये इतकी असल्याचे समजते. ही बाईक तुम्ही कावासाकीच्या डीलरकडे बुक करू शकता. इतर काही देशांमध्ये या बाईकचे बुकींग केव्हाच सुरू झाल्याची चर्चा होती. त्यामुळे भारतात या बाईकचे बुकींग कधी सुरू होणार अशी उत्सुकता होती. 


जून, जुलैमध्ये चाहत्यांच्या भेटीला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बाईक जून २०१८च्या अखेरीस किंवा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लॉन्च होऊ शकते, अशी चर्चा आहे. ZX-10R संपूर्ण बिल्ट यूनिट (सीबीयू) सह पुण्यातील चाकण प्लांटमध्ये तयार होईल. तसेच, बाईकचे काही पार्ट्स जपानमधूनही मागवले जातील. ही बाईक सुपरबाईक लव्हर्समध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. सीकेडी (कंप्लीटली नॉक्ड डाऊन) असेंबल असल्याने या बईकची किंमत बरीच कमी असेल. 


बाईकची खासीयत


कावासाकी निंजा ZX-10R मध्ये ९९८सीसी, लिक्विड कूल्ड, इनलाईन-फोर सिलिंडर इंजिन आहे. त्यामुळे बाईकला 197PS आणि 114Nm ची पॉवर मिळेल. दिल्लीतील एका शोरूममध्ये या बाईकची किंमत १८ लाख असल्याचे सांगितले जात आहे.