रेनॉची डस्टर नव्या लूकमध्ये, २०१८मध्ये होणार भारतात लॉन्च
फ्रान्सची ऑटो कंपनी रेनॉने आपली प्रसिद्ध एसयूव्ही डस्टर गाडीचं नवं 2018 एडिशन सादर केलं आहे.
नवी दिल्ली : फ्रान्सची ऑटो कंपनी रेनॉने आपली प्रसिद्ध एसयूव्ही डस्टर गाडीचं नवं 2018 एडिशन सादर केलं आहे.
या नव्या जनरेशनध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. नव्या डस्टरचा लूक आणखीन बोल्ड केला आहे. रेनॉ डस्टर ही रेनॉच्या जगभरातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे.
भारतीय बाजारपेठेत ही एसयूव्ही सर्वातआधी 2012मध्ये लॉन्च केली होती. तर, Renault Duster भारतीय बाजारपेठेतील कंपनीची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी गाडी आहे.
रेनॉच्याच सहयोगी ब्रँड असलेल्या Daciaने काही दिवसांपूर्वी डस्टरचं नवं मॉडेल सादर केलं होतं. नवी 2018 Renault Duster मध्ये Dacia च्या डस्टर मॉडलपेक्षा काही बदल आहेत. या एसयूव्हीची जगभरात १ मिलियनहून अधिक युनिट्स विक्री झाली आहे.
2018 Renault Duster मध्ये हेडलॅम्प सेक्शनला रिवाइज केलं आहे. डस्टरच्या नव्या मॉडलमध्ये एलईडी डिआरएल्स असणार आहेत. हेडलॅम्पच्या पोझिशनला कॉर्नर केलं आहे जेणेकरुन एसयूव्ही समोरुन पाहिल्यास मोठी वाटेल. नव्या डस्टरच्या बोनेटमध्येही अपडेट करण्यात आले आहेत. यामध्ये आता यू शेप्ड लाईन पहायला मिळेल.
2018 Renault Duster चं केबिन सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत चांगलं असल्याचं दिसतयं. स्टेअरिंग व्हीलमध्येही थोडे बदल करण्यात आले आहेत. यासोबतच डस्टरच्या नव्या मॉडलमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे.
2018 Renault Duster भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेल दन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतात ही गाडी 2018 ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.