नवी दिल्ली : `२०१८ सुझुकी स्विफ्ट'ला ग्लोबली दाखवण्यात आलं होतं, तेव्हापासूनच भारतासह एशियन मार्केटमध्ये या कारच्या लॉन्चिंगची चर्चा रंगली होती. याच बहुप्रतिक्षित सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट कारचं ब्रोशर ऑनलाईन लीक झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या कारशी संबंधीत गोष्टींचा आणि कारच्या किंमतीचाही खुलासा झाला आहे. 


ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, ही कार ६ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आणि या कारची किंमत १८ लाख ३६ हजार जपानी येन(भारतीय रूपयात १०.६२ लाख रूपये) ते २० लाख ५० हजार जपानी येन(भारतीय रूपयात ११.९ लाख रूपये) इतकी असू शकते.  


कारच्या इंजिनबाबत सांगायचं तर यात १.४ लीटरचं चार सिलेंडर बूस्टरजेट इंजिन लावण्यात येईल. जे १४० पीएसची पावर आणि २३० एनएमचा टार्क जनरेट करेल. इंजिनाला ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडण्यात आलाय. वजनाचं म्हणाल तर मॅन्यूअल गिअरबॉक्स असलेल्या कारचं वजन ९७० किलो असेल तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये ९९० किलोग्राम वजन असेल. 


या कारचा लूक फारच शानदार आणि आकर्षक ठेवण्यात आला आहे. यात आधीपेक्षा जास्त चमकदार बॉडी आणि १७ इंचाचे व्हील दिले आहेत. इंटेरिअर दृष्टीकोनातून यात बकेट सीट, लेदरने बंदीस्त केलेलं स्टीअरिंग व्हील दिलं गेलंय. त्यामुळे ही कार तरूणांना अधिक पसंत असा अंदाज व्यक्त केला जातोय.