Honda Elevate: 6 जून रोजी येतेय होंडाची `एलिव्हेट`! पाहा या दमदार SUV चे फिचर्स, किंमत
2023 Honda Elevate: होंडा कंपनीने भारतामधील आपल्या 2 दोन एसयुव्हींचं उत्पादन बंद केलं असल्याने ही एकमेवर कार आता बाजारपेठेमध्ये कंपनीचं प्रतिनिधित्व करणार आहे. या कारचे संभाव्य फिचर्स कोणते ते पाहूयात...
2023 Honda Elevate: होंडा कंपनीने आपल्या आगामी कारची घोषणा केली आहे. कंपनीने मीड साईज एसयुव्ही मार्केटमध्ये लवकरच आपली होंडा एलिव्हेट (Honda Elevate) ही कार लॉन्च करणार असल्याचं म्हटलं आहे. या कारचा फर्स्ट लूक 6 जून 2023 रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात समोर येणार आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून भारतामध्ये कोणतीही नवीन कार लॉन्च करणाऱ्या होंडा कंपनीच्या या कारची झलक कंपनीने टीझरमध्ये दाखवली आहे. सध्या भारतातील एसयुव्ही मार्केटमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. याच स्पर्धेमध्ये आता एलिव्हट इतर गाड्यांशी स्पर्धा करणार आहे.
महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं नाव
याच महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने या गाडीच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर भारतीय रस्त्यांवर या गाडीच्या चाचण्या सुरु असल्याचे काही व्हिडीओही समोर आले होते. सध्या कंपनीने शेअर केलेल्या टिझरमध्ये आर्धी गाडी दिसत असून तिचा टॉप व्ह्यू दाखवण्यात आला आहे. या गाडीला सनरुफ असल्याचं दिसत आहे. सध्या एसयुव्ही सेक्टरमध्ये सनरुफला प्रचंड मागणी असून होंडाच्या नव्या कारमध्येही हे फिचर देण्यात आलं आहे.
इंजिन कसं असू शकेल?
या गाडीमध्ये दोन इंजिनचे पर्याय मिळणाऱ्याची शक्यता आहे. 1.5 लिटर इंजिन 4 सिलेंडरसहीत 121 पीएस, 145 एनएम टॉर्कची क्षमता असेल. तर दुसरं 1.5 लिटरचं हायब्रिड इंजिन असू शकतं. हे इंजिन 126 पीएस, 253 एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यापैकी 1.5 लिटर इंजिन हे सहा मॅन्युएल स्पीड गेअर असणारं तर 1.5 लिटरचं हायब्रिड इंजिन हे ई-सीव्हीटी तंत्रज्ञानाने युक्त असेल. हेच इंजिन कॉन्फिगरेशन असल्याचं होंडा एलिव्हेट गाडी होंडा सिटी (17.8 केएमपीएल एमटी, 18.4 केएमपीएल एटी) आणि सिटी ई एचईव्ही हायब्रीड (26.5 केएमपीएल) इतकं मायलेज देईल. या गाडीचं इंटिरीयर कसं असेल यासंदर्भातील उत्सुकता अजूनही कायम आहे. तसेच कंपनीने इंटिरियरबद्दलची कोणतीही माहिती न दिल्याने याबद्दल कोणतेही अंदाज व्यक्त करण्यात आलेले नाहीत.
या गाड्यांशी करणार स्पर्धा
या गाडीच्या माध्यमातून होंडा कंपनी मिड साईज एक्सयुव्ही सेक्टरमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सध्या या सेक्टरमध्ये दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या हुंडाईची क्रेटा आणि किया कंपनीची सेल्टोज या गाड्यांचं वर्चस्व आहे. या गाड्या परफॉर्मन्सबरोबरच लूक्समध्येही अव्वल आहेत.
होंडा एलिव्हेट ही कंपनीची भारतामधील तिसरी एसयुव्ही आहे. कंपनीने यापूर्वी सीआर-व्ही आणि डब्ल्यूआर-व्ही या गाड्या लॉन्च केल्या आहेत. मात्र या दोन्ही गाड्यांची निर्मिती कंपनीने बंद केली आहे. त्यामुळेच एलिव्हेट ही होंडाची एकमेव एसयुव्ही बाजारात असेल. एलिव्हेट कारची किंमत 11 लाखांपासून पुढे असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.