मुंबई : मोबाईलचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामूळे मोबाईल व्यवस्थित, सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते. आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्येच असे काही ऑप्शन असतात ज्यावर गेल्यास तुमचा मोबाईल सुस्थितीत राहू शकतो. 


बॅटरी वाचविणारी सेटींग्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेटिंगमुळे आपण बॅटरीचे लाईफ वाढवू शकता.  फोन सेटिंग्जमध्ये Developer Option वर क्लिक करा. जर हा ऑप्शन ओपन केला नसेल तर सेटिंग्जमध्ये जाऊन ते सुरू करावे लागेल. सेटिंग्जमध्ये  About Phone मध्ये जाऊन Build number वर ७ वेळा टॅप करा. Developer ऑप्शन ऑन होईल. 
आता Developer मध्ये जाऊन Running Services वर टॅप करा. इथे एक लिस्ट ओपन होईल. यात फोनमध्ये सुरू असणारे सर्व अॅप्स आणि किती बॅटरी यूज होते ते कळेल. इथे असेही काही अॅप दिसतील ज्यांचा तुम्ही वापर करत नाही. त्यावर क्लिक करुन तुम्ही stop करू शकता. यामूळे तुमच्या फोनची बॅटरी वाचू शकते.


हँग होतोय ?


गेम खेळायला गेल्यास फोन हँग होतो. हे टाळण्यासाठी आपल्याला फोनमध्ये एक सेटिंग करणे आवश्यक आहे. यासाठी, फोनच्या Developer मध्ये फोर्स 4x MSAA पर्याय दिसेल. ते सुरू करा.  तुमचा फोन हॅंग होण्यापासून वाचेल.


फोन किती सुरक्षित आहे ?


फोन किती सुरक्षित आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये व्हायरस जाऊ नये तसेच हॅक होऊ नये यासाठी सेटिंग्ज माहित असणे गरजेचे आहे. तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊ तीन लाईनवर टॅप करा. आता सेटिंग्जमध्ये जाऊन खालच्या बाजूस असलेल्या device certification वर क्लिक करा.आपल्याला फोनमध्ये Play Store वर जाणे आवश्यक आहे. नाटक स्टोअरवर जा आणि तीन ओळींवर टॅप करा आता सेटिंग्ज वर जा. आपण खाली डिव्हाइस प्रमाणीकरणाचा पर्याय दिसेल जर आपल्याला प्रमाणित केले गेले तर आपला फोन सुरक्षित आहे. इथे जर Certified लिहिले असेल तर तुमचा मोबाईल सेफ आहे.