मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सगळी कामं अगदी सहज करू शकता. तसेच स्मार्टफोन हे माणसांना जोडण्याचं काम देखील करत आहे. 



Galaxy J3 Price Prime : अगदी आपल्या बजेटमध्ये बसणारा हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 5.0 इंचाच्या साईजमध्ये हा स्मार्टफोन 1.5 जीबी रॅम असलेला आहे. बॅटरी बॅकअपसाठी 2600 एमएएच आहे. फोनमध्ये 2 मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा असून इंटरनल मेमरी 16 जीबी आहे. 



Xolo Era 1X: 5 हजाराहून कमी दरात हा स्मार्टफोन आहे. 4 जी स्मार्टफोनमध्ये 1.3 जीएचझेडमध्ये क्वेड कोर स्प्रेडट्म प्रोससर आहे. 8 मेगा पिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 1 जीबी रॅमच्या या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी मेमरी आहे. हा स्मार्टफोन 5,149 किंमतीचा असून फ्लिपकार्टवर 4,222 रुपयांमध्ये आहे. 



Canvas XP 4G: जर तुमचं बजेट 6 हजारहून कमी असेल तर भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सच्या Canvas XP 4G मध्ये हे शक्य आहे. 3 जीबी रॅम आमि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 8 मेगा पिक्सल रिअर कॅमेरा असून 2 मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 4,945 रुपयांत उपलब्ध आहे. 



Redmi 4A: रेडमी हा स्मार्टफोन भारतीय मार्केटसोबतच ग्लोबल मार्केटमध्ये लोकप्रिय झाला आहे. 2017 मध्ये एकूण 2.12 करोट स्मार्टफोनची विक्री झाली आहे. फोनमध्ये 13 मेगा पिक्सल कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा 5 मेगा पिक्सल आहे. 



Redmi 5A : चायनिज कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 5 इंच डिस्प्ले साइज आणि 1.4 गीगा हार्टज प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये असून 2 जीबी रॅम आहे. 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.